Shruti Vilas Kadam
भगवंत सांगतात की, कर्म न करता संन्यास घेणारा आणि कर्म करतानाही फळाची अपेक्षा न ठेवणारा – हे दोघंही तत्त्वतः सारखेच आहेत.
कोणतेही कर्म करताना त्याच्या फळाची आसक्ती न ठेवणे हेच खरे वैराग्य आहे. कर्म करत राहा, पण फळांची चिंता करू नका.
फळांची अपेक्षा न ठेवून केलेल्या कर्मामुळे मन शांत राहते आणि अंतःकरण शुद्ध होते.
जो व्यक्ती सर्व ठिकाणी परमात्म्याचे दर्शन करतो, त्याच्यासाठी सुख-दुःख, विजय-पराजय, मान-अपमान सारखेच असतात.
ज्ञानी पुरुष सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो – मग तो ब्राह्मण असो, कुत्रा असो किंवा गाढव.
आत्मज्ञान मिळवल्यानंतर व्यक्ती संसाराच्या गुंत्यात अडकत नाही. आत्म्याचे स्वरूप जाणणारा माणूस मुक्त होतो.
जो स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून भगवंताला समर्पित होतो, त्यालाच परम शांती मिळते. त्याची कर्मे त्याला बांधून ठेवत नाहीत.