Ruchika Jadhav
कुरमुऱ्यांची चटपटीत भडंग छोटी भूक लागल्यावर सर्वच जणांना खावीशी वाटते. स्नॅक्समध्ये तुम्हालाही भडंग खावी असं वाटत असेल.
भडंग बनवण्यासाठी सर्वात आधी कडक पांढऱ्या रंगाचे कुरमुरे घ्या. कुरमुरे नरस असल्यास थोडे भाजून घ्या.
त्यानंर एका कढईत थोडं तेल टाकून त्यात शेंगदाणे, चणा डाळ आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स भाजून घ्या.
भडंग आणखी जास्त टेस्टी असावी त्यासाठी त्यामध्ये कढीपत्ता मिक्स करा. तुम्ही यात टाकणारा कढीपत्ता भाजून किंवा तळून घेऊ शकता.
आरोग्यासह पदार्थाची चव वाढवण्यासाठी लसूण फार महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे लसूण सुद्धा तेलात तळून घ्या.
मसाले तयार करताना हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, धने पावडर, पिठी साखर एकत्र मिक्स करून घ्या.
कुरमुऱ्यांमध्ये सर्व मसाले आणि साहित्य छान मिक्स करून घ्या. हे सर्व मिक्स झाल्यावर हवा बंद डब्ब्यात स्टोअर करून ठेवा.