साम टिव्ही ब्युरो
'भाबीजी घर पर है' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत शुभांगी अत्रेने 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेने अभिनेत्रीने घराघरात आपली ओळख निर्माण केली.
शुभांगीने शो सोडल्यापासून बराच काळ लोटला असला तरी लोक तिला अजूनही 'अंगुरी भाभी' या नावाने ओळखतात.
शुभांगीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा रेट्रो लूक स्पष्ट दिसत आहे.
शुभांगीने हे फोटोशूट मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये केले आहे.
या फोटोशूटची खास गोष्ट म्हणजे शुभांगीने फोटोच्या कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शुभांगीने लिहिले आहे की, आयुष्य म्हणजे संतुलन, तेही दोन गोष्टींमधील. तुम्हाला काही गोष्टी धरून ठेवाव्या लागतात आणि काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, हे जीवन आहे.
शुभांगी आता सिंगल मदर आहे. ती एकटीच आपल्या मुलीला वाढवत आहे. अभिनेत्रीच्या पतीचे नाव पियुष पुरी होते.
शुभांगीने यावर्षी मार्च महिन्यात सांगितले होते की, 19 वर्षांनंतर ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे.