Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योगा हा केवळ व्यायाम नसून यामुळे शरीराला देखील फायदा होतो.
धनुरासन आसन पोटातील इंद्रियांना मसाज करते आणि पचनशक्ती सुधारते. संपूर्ण शरीराचा आकार सुधारतो पोटाची चरबी कमी होते.
कमरेच्या बाजूला साचलेली चरबी कमी करण्यासाठी त्रिकोणासन करावा दोन्ही पायांत अंतर ठेवून उभे राहा. उजवा हात उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करेल आणि डावा हात वरच्या दिशेला सरळ असेल अशा स्थितीत वाका.
योगामुळे स्नायू लांब आणि सुडौल होतात. यामुळे शरीर जाड न दिसता बारीक दिसते. शरीराचा आकार छोटा दिसतो.
अनेकदा लोक ताणतणावामुळे जास्त खातात. योगा आणि प्राणायणामुळे कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते. मन शांत होते व भूक लागत नाही.
रोज नियमितपणे एक तास योगा केल्याने शरीराला फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी योगा केल्याने वजन कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.