Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे. योगामुळे केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत, तर शरीराची पचनक्रिया सुधारते.
वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येतील अशी 5 योगासने कोणती आहेत ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वात प्रभावी योगा मानला जातो. १२ आसनांचा हा योगा केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
नौकासन केल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
त्रिकोणासन हे आसन पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामुळे कंबर लवचिक होते आणि पचनशक्ती सुधारते.
फलकासन केल्याने खांदे, पोट आणि मांड्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो. यामुळे स्नायू मजबूत होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.