ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण दरवर्षी दसऱ्याला एकमेकांना शुभेच्छा देतो. आता इंस्टाग्रामवर अनेक लोक सगळ्या सणावारांना शुभेच्छा देतात.
इंस्टाग्रामवर तुम्ही नेहमीसारख्या शुभेच्छा न देता काही चारोळींचा वापर करुन शुभेच्छा देवू शकता त्या पुढील प्रमाणे आहेत .
समृद्धीचे दारी तोरण , आनंदाचा हा दसरा सण सोने लुटून हे शिलगण
हर्षाचे उजळू द्या अंगण, सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा! सर्वांना शुभ दसरा.
दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!
दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
आला आला दसरा, दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा साजरा करु दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
NEXT: नवरात्रीला रात्रीला ट्राय करा सगळ्यात हटके आउटफीट, तुमचा लूक दिसेल एकदम झक्कास !