Pune Tourism: महाबळेश्वरही विसराल! उकाड्यात पुण्याजवळ पिकनीकसाठी हे ऑप्शन ठरतील परफेक्ट

Surabhi Jayashree Jagdish

उकाडा वाढला

एप्रिल-मे महिन्यात तापमान वाढल्यामुळे शहरात उकाडा सहन करणं कठीण होतं. यामुळे लोकांना थंड ठिकाणी फिरण्याची फार इच्छा होते. थोडा वेळ का होईना पण गार वातावरणात वेळ घालवणं मनाला शांतता देतं.

weekend getaways near Pune

विकेंड ट्रिप

पुण्याजवळील अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही विकेंड ट्रिपसाठी जाऊ शकता. कमीत कमी वेळात प्रवास करून तुम्ही या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. कुटुंब, मित्र किंवा पार्टनरसोबत हे बेस्ट ऑप्शन आहेत.

summer travel destinations India

छोटासा ब्रेक

थंड ठिकाणी फिरल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने ताण कमी होतो आणि ऊर्जा वाढते. म्हणूनच उन्हाळ्यात थोडा ब्रेक घेऊन अशा ठिकाणी जाणं आवश्यक आहे.

hill stations near Pune

खंडाळा

खंडाळा हे पुणे-मुंबई मार्गावरचं सुंदर हिल स्टेशन असून उन्हाळ्यातही याठिकाणी हवामान आल्हाददायक असतं. याठिकाणी भुशी डॅम, ड्युक्स नोज, लायन पॉइंट अशी निसर्गरम्य ठिकाणं पाहता येतात. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक दिवसाची ट्रिप करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

cool places near Pune

इगतपुरी

इगतपुरी हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं थंड आणि हिरवंगार ठिकाण आहे. याठिकाणी त्रिंगलवाडी किल्ला, भंडारदरा धरण आणि विपश्यना केंद्र पाहण्यासारखं आहे. निसर्गप्रेमी आणि शांत वातावरण शोधणाऱ्यांसाठी इगतपुरी आदर्श ठरतो.

Pune travel guide

कोकण

कोकण भागात गणपतीपुळे, तर्कर्ली, मालवण असे सुंदर समुद्रकिनारे आहेत. इथे समुद्राचा गारवा, नारळाची झाडं आणि स्वच्छ हवा अनुभवता येते. उन्हाळ्यात थंड वाऱ्यासह समुद्रकिनारी वेळ घालवण्याचा वेगळाच आनंद मिळतो.

short trips from Pune

माळशेज घाट

माळशेज घाट हे पुण्याजवळील अत्यंत सुंदर घाटमाथ्याचं ठिकाण आहे. याठिकाणी उंच डोंगर, खोल दऱ्या आणि धबधबे पाहून मन प्रसन्न होतं. पावसाळा जास्त प्रसिद्ध असला तरी उन्हाळ्यातही इथे गारवा अनुभवता येतो.

places to visit near Pune

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा