ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जिथे दररोजचे जेवण तयार केले जाते आणि स्वयंपाकघरात लक्ष्मीदेवीचा वावर सतत असतो.
पण जेव्हा स्वयंपाकघर विस्कटलेले किंवा अस्थाव्यस्थ असते तेव्हा स्वयंपाक करणे कठीण वाटू लागते.
प्रथम अनावश्यक वस्तू काढून टाकणे. तुटलेल्या, जुन्या किंवा कालबाह्य झालेल्या वस्तू फेकून द्या.
स्वयंपाकघराला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागा. जसे की स्वयंपाकाची जागा , भाजी कापण्याची जागा, स्टोरेज साठवण्याची जागा, वॉशिंग मशीनची जागा इ.
सहज वस्तू ओळखण्यासाठी प्रत्येक जार, बॉक्स आणि कंटेनरवर नावे लिहा.
स्वयंपाक करताना सहज हात पोहोचण्यासाठी गॅसजवळ मसाल्यांचा रॅक ठेवा.
ओव्हरहेड जागेचा वापर करा. कॅबिनेटच्या वर किंवा भिंतींवर हुक आणि रॅक जोडून अतिरिक्त स्टोरेज तयार करा.
तसेच, फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि स्नॅक्स वेगवेगळ्या जागेवर ठेवून तुमचा फ्रीज व्यवस्थित ठेवा.