Siddhi Hande
मुंबईचा वडापाव फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मुंबईत सर्वात चविष्ट वडापाव कुठे मिळतो,तुम्हाला माहितीये का?
मुंबईतील सर्वात पहिला सुरु झालेला आराम वडापाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांची बटाट्याची भाजी ही पांढऱ्या रंगाची असते.
दादरच्या किर्ती कॉलेजबाहेर अशोक वडापाव स्टॉल आहे. या वडापावमध्ये छान चुरा दिलेला असतो.
घाटकोपर स्टेशनबाहेरचा भाऊ वडापाव हा त्यांच्या चटणीमुळे प्रसिद्ध आहे. ते छान खोबऱ्याची चटणी देतात.
ठाण्यातील गजानन वडा हा खूप टेस्टी असतो. त्यासोबत मिळणारी पिवळ्या रंगाची चटणी ही बेस्ट असते.
विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर असणारा आनंद वडापाव हा चवीला खूप मस्त येतो. येथे नेहमी रांग असते.
भायखळा स्टेशनबाहेरील ग्रॅज्युएट वडापाव हा बेस्ट आहे.
ठाण्यातील तंदूर वडापाव खूप प्रसिद्ध आहे. अष्टविनायक वडापाव येथे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील.