Siddhi Hande
पावसाळ्यात ट्रेकिंगला गेल्यावर मसाला मॅगी बनवायची मज्जा काही वेगळीच असते. तुम्हाला त्या मागीची चव कुठेही मिळणार नाही.
ही ट्रेकिंगला गेल्यावर मिळणारी मॅगी तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. ही मॅगी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल.
सर्वात आधी तुम्हाला कांदा, टॉमेटो आणि कोथिंबीर, मिरची बारीक चिरुन घ्यायचे आहे.याचसोबत तुम्ही कॉर्न आणि वाटाणेदेखील घेऊ शकतात.
एका कढईत तेल टाका. त्यात मोहरीची छान फोडणी द्या.त्यात मिरच्या टाका.
त्यानंतर हळूच कांदा टाकून छान परतून घ्या. त्यात टॉमेटो टाका. कांदा टॉमेटो फारवेळ परतू नका. यानंतर कॉर्न आणि वाटाणे टाका.
यानंतर यावर मॅगी मसाला,घरचा मसाला आणि मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर छान मिक्स करा.
या मिश्रणात चमचाभर पाणी टाका. त्यानंतर छान उकळी आली की मग वरुन आवश्यकतेनुसार अजून पाणी टाका.
त्यानंतर यात मॅगी टाका. आणि छान हलवून घ्या.
मॅगी छान शिजली की त्यावर मस्त कोथिंबीर टाकून गार्निश करा. ही मॅगी खाताना तुम्हाला नक्कीच ट्रेकिंगचा अनुभव येईल.