ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात हिमवर्षावाचा अनुभव घेण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
अशाच पर्यटकांसाठी आम्ही भारतातील उत्तम ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत.
पर्यटकांना भारतातील या ठिकाणांवरुन सुंदर असा हिमवर्षाव अनुभवता येणार आहे.
हिवाळ्यामध्ये सुट्टीचा पुरेपुरे आनंद घेण्यासाठी शिमला एक योग्य ठिकाण आहे.
मनाली शहर भव्य पर्वत, जंगले, वळणदार रस्ते आणि सुंदर हिमवर्षावासाठी प्रसिद्ध आहे.
कुल्लू शहर हे हिवाळ्यातील रोमँटिक सु्ट्टीसाठी योग्य आहे.
गुलमर्ग हे भारतातील सर्वेाच्च ठिकाणांपैकी एक आहे. या शहरात पर्यटकांना गोंडोला राईड अनुभवता येणार आहे.
कुमाऊँ प्रदेशात वसलेले, नैनिताल हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिमवर्षाव ठिकाण आहे.
औली शहर हे उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात वसलेले असल्याने पर्यटकांना हिवाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
NEXT: अप्रतिम, सुरेख असं मनमोहक कॉमेडीक्वीनचं सौंदर्य