Shreya Maskar
अंघोळ ही आपल्या दैनंदिन दिनचर्येतील महत्त्वाची सवय आहे. काही लोकांना सकाळी अंघोळ केल्याशिवाय दिवसाची सुरुवात करावीशी वाटत नाही, तर काही जण रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे पसंत करतात. पण आरोग्याच्या दृष्टीने सर्वात योग्य वेळ कोणती, जाणून घेऊयात.
सकाळी अंघोळ केल्याने झोपेचा आळस कमी होण्यास आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करण्यास मदत होते.सकाळी अंघोळ केल्याने नियमित स्वच्छतेची सवय टिकवणे सोपे जाते.
रात्री झोपताना त्वचेवर जमा झालेला घाम आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यास मदत होते.
दिवसभरातील धूळ, घाम आणि त्वचेवरील मळ काढण्यास मदत होते. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो.
झोपण्याच्या साधारण एक ते दोन तास आधी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने काही लोकांना झोप लागण्यास मदत होऊ शकते. डोकं शांत राहते.
अंघोळ करण्यासाठी सकाळ किंवा रात्र यांपैकी एकच वेळ सर्वांसाठी सर्वोत्तम आहे, असे नाही. तुमची दिनचर्या, शारीरिक हालचाल, हवामान आणि वैयक्तिक पसंती यानुसार वेळ निवडता येते.
खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. राच वेळ अंघोळ करत राहू नका. अंघोळीनंतर त्वचा हलकेच पुसून मॉइश्चरायझर लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.