Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात आरोग्यासह केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. थंडीत वातावरण गार असते अशावेळेस केस देखील कोरडे, कडक होतात यामुळे केसांची काळजी घ्या.
थंडीच्या दिवसात केसांना तेल कधी लावावे? याविषयी जाणून घ्या. केसांना रात्री तेल लावल्याने केसांमध्ये कोंडा होतो.
केसांना रात्री तेल लावून झोपल्याने टाळूवर फंगल इन्फेक्शन होऊ शकतो जास्त वेळ केसांवर तेल राहल्यास टाळूची त्वचा तेलकट होते व केस कोरडे होतात.
रात्री तेल लावल्यामुळे चेहऱ्यावर देखील पसरतो यामुळे पिंपल्स व मुरूमे त्वचेवर येतात.
केस धुण्याच्या एक ते दोन तास आधी केसांना तेल लावणे योग्य आहे यामुळे केस चिकट पण होत नाही.
तेल हे नेहमी कोमट करून केसांना लावावे व केसांचा मसाज करावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.