Shreya Maskar
संध्याकाळच्या थंडगार हवेत अस्ताला जाणारा सूर्य पाहणे म्हणजे स्वर्गसुखच होय.
मावळतीच्या सूर्याच्या रंगीबेरंगी छटा मनाला शांत करून जातात.
बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तिघांचा संगमसोबत सूर्यास्त पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे सुख अनुभवणे होय.
फेसाळलेल्या समुद्रात सोनेरी छटा दिसणारा सूर्यास्त पाहून मन तृप्त होते.
वाराणसीच्या गंगा घाटावरून फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
गंगा घाटावर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
हिमालयाच्या कुशीतून वाहणाऱ्या या नदीवरून सूर्यास्त पाहण्याची मज्जाच वेगळी आहे.
सूर्यास्ता वेळी आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य पाहून अंगावर तर शहाराच येतो.
धुक्यात हरवत जाणारा सूर्याचे अद्भुत रूप डोळ्यात टिपायचे असल्यास आयुष्यात एकदा तरी टायगर हिलला भेट द्या.
बर्फाळ प्रदेशातील थंडगार करणारा सूर्यास्त पाहणे म्हणजे निसर्गाचं चमत्कार अनुभवने होय.