Manasvi Choudhary
सुंदर दिसावे अशी प्रत्येकांची इच्छा असते. यासाठी अनेक महिला व पुरूष उपाय करतात. त्वचेची काळजी घेतात.
अनेकजण पार्लरमध्ये महागड्या ट्रिंटमेट्स घेतात. मात्र यामुळे त्वचेवर परिणाम देखील होऊ शकतो यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो करा.
बाहेरून किंवा ऑफिसवरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावरील धूळ, माती आणि साचलेला घाम काढून टाकणे महत्वाचे आहे.
त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे.
पुरुषांनी आणि महिलांनी चेहरा धुवल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि लवचिकता टिकून राहते.
घराबाहेर पडताना सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर महत्वाचा आहे.
त्वचा टवटवीत राहण्यासाठी ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.