Best Salt for Daily Use: सेंधव, काळं की साधं मीठ? रोजच्या जेवणात कोणत्या मिठाचा वापर करावा? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Shruti Vilas Kadam

साधे पांढरे मीठ

साधे पांढरे मीठ प्रत्येक घरात वापरले जाते. यामध्ये सोडियम आणि क्लोराइड असते. काही मिठात आयोडीन मिसळलेले असते. आयोडीनमुळे थायरॉईड ग्रंथीचे काम व्यवस्थित चालण्यास मदत होते.

Salt | pinterest

काळे मीठ

काळ्या मिठाची चव आणि वास वेगळा असतो. भेळ, चाट, रायता आणि कोशिंबिरीमध्ये याचा वापर केला जातो. काही लोक काळे मीठ खाल्ल्याने गॅसचा त्रास कमी होतो असे मानतात.

Black salt

खडे मीठ म्हणजे काय?

खडे मीठ जमिनीतून मिळते. यालाच सेंधा मीठ किंवा रॉक सॉल्ट म्हणतात. हे पांढऱ्या आणि गुलाबी रंगात मिळते. उपवासाच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.

Best Salt | Yandex

कोणत्या मिठात सोडियम कमी असते?

साधे मीठ, काळे मीठ आणि खडे मीठ या तिन्हींमध्ये सोडियम असते. त्यामुळे कोणतेही मीठ जास्त खाऊ नये. मिठाचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे.

salt | pinterest

आयोडीनयुक्त मीठ का खावे?

आयोडीन शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. यामुळे थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करते. शरीरात आयोडीन कमी झाल्यास थायरॉईडच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या जेवणात आयोडीनयुक्त मीठ वापरणे चांगले.

salt | pinterest

दिवसभरात किती मीठ खावे?

जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. यात घरातील जेवणातील आणि बाहेरच्या पदार्थांमधील मिठाचाही समावेश होतो.

salt

रोजच्या जेवणासाठी कोणते मीठ चांगले?

रोजच्या जेवणासाठी आयोडीनयुक्त साधे मीठ वापरणे चांगले. काळे मीठ आणि खडे मीठही चवीनुसार वापरू शकता. पण, मिठाचा वापर नेहमी कमी प्रमाणात करावा.

Salt | GOOGLE

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Salt | pinterest

Tea or Coffee After Meals: जेवल्यानंतर चहा पिणे योग्य की कॉफी? जाणून घ्या पचनावर काय होतो परिणाम

Diabetes Causes | Saam Tv
येथे क्लिक करा