Saam Tv
बीटमध्ये असणारे बिटालेस अँटीऑक्सिडंट्स लिवरमधील सूज कमी करतात. लिवरला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात.
लिंबात आणि संत्र्यांमध्ये सायट्रसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लिवरमधील नैसर्गिक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते
गाजरात भरपूर प्रमाणात बीटा -कॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए असते. यामुळे लिवरच्या पेशींचे नुकसान होत नाही.
आवळा हा डिटॉक्ससाठी उत्तम फळ मानले जाते. आवळा खाल्ल्याने लिवर सुधारते. याशिवाय फॅटी लिवर आणि यकृताची सूज कमी होते.
मुळ्यामध्ये सल्फरयुक्त घटक असतात. ज्यामुळे लिवर आणि पित्ताशय उत्तेजित होण्यास मदत होते. पित्त व्यवस्थित राहते.
रताळ्यामध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे लिवरभोवती जमणारी अतिरिक्त चरबी नियंत्रित करते.
या कंदमुळात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. याशिवाय व्हिटॅमिन सी आणि ग्लुकोसिनोलेट्सचे प्रमाण जास्त असल्याने लिवरच्या पेशींना खराब होण्यापासून वाचवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.