पावसाळ्यात महाबळेश्वर-लोणावळ्यापेक्षा ठाण्यातील 'या' ३ ठिकाणी फिरा; येईल तुफान मज्जा!

Manasvi Choudhary

ठाणे

ठाणे हे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. ठाण्यात अनेक ठिकाणं अशी आहे जेथे तुम्ही कुटुंबासोबत, लहान मुलांसोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.

Thane Tourism | google

प्रसिद्ध ठिकाणे

पावसाळ्या लांब कुठे जाण्यापेक्षा तुम्ही ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकता.

Thane Picnic Spots | Saam Tv

तलावांचे शहर

'तलावाचे शहर' म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. ठाणे शहरात अनेक प्राचीन मंदिर, किल्ला आणि उद्याने आहेत.

Thane | Saam Tv

कचराळी तलाव

ठाण्यातील कचराळी तलाव हे मुख्य शहराच्या ठिकाणी आहे. तलावाच्या मधोमध एक सुंदर कारंजे आहे, जे संध्याकाळच्या वेळी रोषणाईमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथे गेल्यानंतर तुम्हाला बोटिंगचा आनंद लुटता येईल.

Thane Travel | SAAM TV

लहान मुलांसाठी आकर्षण

लहान मुलांसाठी 'कचराळी तलाव' हे उद्यान आकर्षण ठरू शकते. विविध खेळणी, राईडचा आनंद मुलांना घेता येतो. तलावाच्या चारी बाजूंनी उत्तम पद्धतीचा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अनेक फिटनेस प्रेमी या ठिकाणाला भेट देतात. व्यायाम करतात.

thane picnic spot | google

घोडबंदर किल्ला

घोडबंदर किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभलेला किल्ला आहे. एका छोट्या टेकडीवर वसलेला हा किल्ला ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम वीकेंड डेस्टिनेशन आहे.

Ghodbunder Fort | Google

किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग

ठाणे रेल्वे स्टेशनवरून घोडबंदर रोडने जाणाऱ्या बस किंवा खाजगी वाहनाने थेट घोडबंदर जंक्शनपर्यंत पोहोचता येते. तिथून किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे.

Ghodbunder Fort | google

टिकुजीनीवाडी

ठाण्यात टिकुजीनी वाडी हे प्रसिद्ध वॉटरपार्क आहे. पावसाळ्यात येथील परिसर हिरवाईने समृद्ध येतो. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. येथील परिसरात एक मोठे शिव मंदिर आहे, जिथे महादेवाची भव्य मूर्ती पाहायला मिळते.

Tikuji-ni-Wadi | pintrest

NEXT: सकाळी Blood Sugar Level किती असावी?

Blood Sugar Level
येथे क्लिक करा..