ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जैसलमेर हे राजस्थानमधील एक सुंदर शहर आहे जे सुवर्ण किल्ला आणि वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही विविध ऍक्टिव्हिटीज करू शकता.
वाळवंटातील वाळूतून उंटावर छान नजारा बघत स्वारी करा आणि सनसेट बघण्याचा पुरेपुर आनंद घ्या. सुंदर देखाव्या बरोबर तुमचे फोटोज् काढा.
चांदण्या रात्री वाळवंटात कॅम्पिंग करा आणि तेथील लोकसंगीताचा आनंद घ्या. तसेच कॅम्प फायर भोवती बसून जेवण करा. रात्रीच्या कॅम्पिंगची मित्र परिवार किंवा कुटूंबासोबत मज्जा घ्या.
जैसलमेर किल्ला हा १२ व्या शतकात बांधला गेला आहे. या सुवर्ण किल्ल्याची भव्यता आणि इतिहास जवळून जाणून घेण्यासारखा आहे. लहान मुलांना किल्ला दाखवणे हा योग्य पर्याय आहे.
गडिसर तलाव हा जैसलमेर येथील कृत्रिम तलाव आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा तलाव जैसलमेर शहराच्या अगदी मधोमध आहे.
जैसलमेरमध्ये खरेदीसाठी तुम्ही भाटिया बाजार, जैसलमेर फोर्ट आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये फिरून तेथील पारंपरिक कपडे, साड्या, हस्तकला आणि स्थानिक मिठाई खरेदी करू शकता.
जैसलमेरमधील स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्या, दाल बाती चुरमा आणि केर संगरी यांसारखे पारंपारिक पदार्थ जरुर खा.