ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ठाणे शहरापासून साधारण ५० किमी अंतरावर तानसा तलाव आहे. तानसा तलावामधून मुंबई आणि ठाणे शहराला पुरवठा केला जातो. या ठिकाणी अनेक निसर्गप्रेमी येत असतात.
ठाणे शहरापासून ८८ किलोमीटरच्या अंतरावर केळवा बीच आहे. रोजच्या कामातून शांतता मिळण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.
ठाणे शहराच्या मध्यभागी कोपिनेश्वर मंदिर स्थित आहे. दररोज असंख्य नागरिक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात.
ठाणेकरांच्या आवडीचे असे मासुंदा तलाव. सायंकाळी या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत असतात शिवाय या तलाव अनेकजण बोट राईटचा आनंद घेत असतात.
निसर्ग प्रेमीसाठी ओवळेकर वाडी हे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. ओवळेकर वाडीतील उद्यानात तुम्ही अनेक प्रकारचे फुलपाखरु पाहायल मिळतील
बासीन किल्ला ठाणे शहारापासून साधारण २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. असंख्य पर्यटक हा किल्ला पाहायला येत असतात.
ठाणे शहरापासून अवघ्या १३ किमी अंतरावर आहे. ऐतिहासीक अशी ओळख या घोडबंदर किल्ल्याला आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर उपवन तलाव आहे. दररोज अनेक नागरिक या तलावाजवळ जात असतात.