Manasvi Choudhary
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढीची समस्या अनेकांना उद्भवत आहे. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ बसणे आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम देखील वजन वाढीवर होत आहे.
वजन वाढल्यामुळे शरीराच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. लठ्ठपणा सहज वाढतो मात्र नियंत्रणात आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
वजन कमी करणयासाठी अनेकजण जिममध्ये जातात बराच वेळ व्यायाम करतात. मात्र तरीदेखील वजन कमी होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या ५ ड्रिंक्सचे सेवन केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.
अनेक लोक दिवसा ग्रीन टीचे सेवन करतात मात्र ग्रीन टी मधील अँटीऑक्सिड्ंटस गुणधर्म शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
जिऱ्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाण्यात पुदीना, जिरे आणि आलं हे मिक्स उकळून प्या.
दालिचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. दररोज रात्री एक कप दालचिनीचे पाणी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.