New Year Celebration Places : फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचा प्लॅन करत आहात? मग मुंबई जवळील या ठिकाणांना नक्कीच जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारदरा

निसर्गाच्या कुशीत शांत वातावरणात न्यू इयर साजरा करायचा असेल तर भंडारदरा हे ठिकाण बेस्ट पर्याय आहे. धबधबे, धरण आणि थंड हवा यांचा खास अनुभव घेवू शकता.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

मुरबाड

मुंबईपासून जवळ असलेलं हे ठिकाण गर्दीपासून दूर आहे. नदीकाठी जाऊन चुलीवरील जेवणाचा आनंद घेता येईल. तसेच होमस्टे पार्टीसाठी परफेक्ट ठिकाण आहे.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

कर्जत

येथे जाऊन तुम्ही कॅम्पिंग करु शकता. तसेच फार्महाऊस, बोनफायर आणि मित्रांसोबत गप्पा मारत न्यू इयरची सुरुवात करु शकता.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

इगतपुरी

मुंबई जवळील इगतपुरी हा शांत बाजूचं भाग असल्यामुळे हे ठिकाण न्यू इयरसाठी बेस्ट आहे. थंडित पडणारे धुके, डोंगररांगा आणि सुंदर सनराईजचे दृश्य मन मोहून टाकतात.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

हरिश्चंद्रगड

ट्रेक न करता देखील गडाच्या पायथ्याशी राहून निसर्गाचा आनंद घेता येतो. स्टार गॅझिंग आणि शांतता खास आकर्षण आहे.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

जव्हार

आदिवासी संस्कृती, धबधबे आणि थंड हवामान यामुळे जव्हार न्यू इयरसाठी हिडेन गेम म्हणून ओळखले जाते. जव्हार हे ठिकाण बजेट ट्रिपसाठी ही एकदम योग्य आहे. येथे तुम्ही पोपटी पार्टी सुध्दा करु शकता.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

पळसदरी लेक

कर्जतजवळील हे लेक फार कमी लोकांना माहीत आहे. लेक व्ह्यू, सनसेट आणि शांत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट ठिकाण आहे.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

डहाणू

अलिबागपेक्षा कमी गर्दी असलेला पालघर जवळील डहाणू बीच खुप प्रसिध्द आहे. येथे मित्रमैत्रिणी सोबत जाऊन शांत बीचच्या ठिकाणी जेवणाचा प्लॅन करु शकता.

Mumbai New Year Celebration | GOOGLE

Dapoli : गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी जायचे असेल तर, कोकणातील या ठिकाणी नक्कीच जा

Dapoli | GOOGLE
येथे क्लिक करा