Manasvi Choudhary
तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी... आज झाली माझी गृहलक्ष्मी,...आहे माझी भाग्यलक्ष्मी!
तालुक्यात तालुका, तालुक्यात गाव... आमच्या गावात सर्वांनी ऐका नाव, [बायकोचे नाव] सोबत जोडली आयुष्याची नाव!
चपातीचे पीठ मळायला लागते परात... [बायकोचे नाव] चे नाव घेतो, जी होती मनात तीच आणली दारात!
चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली... पण [बायकोचे नाव] कडेच होती माझ्या हृदयाची खरी किल्ली!
काश्मिरच्या नंदनवनात नाचतो मोर... [बायकोचे नाव] चे नाव घेतो, बायको अशी मिळाली की भाग्य माझे थोर!
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ... [बायकोचे नाव] ने दिला मला आयुष्यभर प्रेमाचा हात!
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने... [बायकोचे नाव] च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाच्या नात्याने!