Manasvi Choudhary
संध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला सुरूवात झाली. नोव्हेंबर महिना गुलाबी थंडीचा महिना समजला जातो.
अशावेळी थंड वातावरणात तुम्हाला जर फॅमिली पिकनीकचा प्लान करायचा असेल तर मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे कोणती ते जाणून घेऊया.
मुंबईपासून जवळ असलेले ठाणे या शहराला तुम्ही भेट देऊ शकता. ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.
ठाणे शहरात तुम्ही विकेंडसाठी खास ट्रिप प्लान करू शकता. येऊर हिल्स, उपवन या ठिकांणी तुम्ही वेळ घालवू शकता.
ठाण्याच्या बाजूला माथेरान हे प्रसिद्ध ठिकाण आहे. माथेरान हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. घनदाट जंगल, उंच पर्वत असलेल्या या ठिकांणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
कर्जत हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते. हिरवाईने समृद्ध असलेल्या या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. अनेक ट्रेकर्स येथे रिव्हर राफ्टिंग आणि कॅम्पिंगसाठी येतात.
ठाण्याच्या बाजूला असलेला हा समुद्रकिनारा आहे. शांत आणि समुद्राच्या लाटांमध्ये तुम्ही या ठिकाणी वेळ घालवू शकता. सायंकाळी येथून सूर्यास्त दिसतो.