Saam Tv
गॅस, किचन प्लॅटफॉर्म किंवा सिंकवर खरकट जास्त वेळ ठेवू नका. यामुळे घरात माश्या आणि झुरळ होतात. त्यामुऴे वेळोवेळी स्वच्छ करा.
सिंकमध्ये भांड्यांचा ढिग लागल्याने किचन अस्ताव्यस्त दिसतं. त्यामुळे शक्य तितक्या लवकर भांडी स्वच्छ करा. जागेवर ठेवा.
स्वयंपाक करताना टाईल्सवर उडालेले तेल वेळीच साफ करा. उशीरा साफ केल्यावर टाईल्सवर पिवळेपणा कायम राहतो.
मसाल्यांचे डब्बे, चमचे, तेलाच्या बाटल्या स्वच्छ पुसून जागेवर ठेवून द्या. यामुळे पसारा होणार नाही आणि वस्तू शोधण्यात वेळही जाणार नाही.
सिंकच्या कोपऱ्यात अन्नाचे कण किंवा घाण साचू देऊ नका. भांडी धुतल्यानंतर सिंकही स्वच्छ धुवा. शक्य असल्यास कोरडे ठेवा.
ओला कचरा जास्त वेळ किचनमध्ये ठेवू नका. जेवण झाल्यानंतर लगेचच कचरा टाकून द्या. कारण ओल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि झुरळ, माश्या घरात येतात .
आठवड्यातून एकदा कॅबिनेट, फ्रिज, मसाल्यांचे डब्बे आणि किचनच्या कोपऱ्यांची स्वच्छता करा. यामुळे किचन सुंदर आणि स्वच्छ दिसेल.