Saam Tv
प्रत्येक जॉबसाठी इंटरव्ह्यू ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते. यावरूनच त्या कंपनीत जॉब मिळेल की नाही हे अवलंबून असते.
ज्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जात आहात, ज्या पोस्टसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात. त्याची संपूर्ण माहिती असायला हवी म्हणजे कोणता प्रश्न विचारताच अडकायला नको.
कंपनीविषयी आणि पोस्टविषयी व्यवस्थित माहिती घेऊन गेलात तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही प्रभाव पाडू शकता.
प्रथम म्हणजे इंटरव्ह्यूसाठी कंपनीत १०-१५ मिनिटे आधीच पोहचा. यामुळे तुम्हाला वेळेचे महत्त्व आहे हे दिसून येते.
रेग्युलर, कॅझ्युअल कपडे इंटरव्ह्यूसाठी केव्हाच घालू नये. व्यवस्थित इस्त्री केलेले फॉर्मल कपडे घालूनच इंटरव्ह्यूसाठी जावे.
नेहमी लक्षात ठेवा इंटरव्ह्यूमध्ये किंवा अन्य कुठेही तुमचे पहिले इंप्रेशन हे शेवटचे इंप्रेशन असते.
इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे देताना हसून आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एकदम स्पष्ट द्यावी. उत्तर देताना जास्त उत्साह किंवा स्ट्रेसही चेहऱ्यावर दिसू देऊ नये.