Manasvi Choudhary
केस गळणे या समस्येने महिलांसह पुरूष देखील त्रस्त झाले आहेत. बाजारातील अनेक उत्पादने वापरून देखील केस गळती थांबत नाही.
केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही घरीच सोपे उपाय करू शकता यामुळे केसांची गळती थांबेल.
रासायनिक शॅम्पू किंवा महागड्या ट्रीटमेंटपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय अनेकदा जास्त प्रभावी ठरतात.
केस गळती रोखण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी 'कांदा आणि मेथी दाण्यांचा' हेअरमास्क लावा
सर्वात आधी रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी भिजवलेले मेथी दाणे आणि कांद्याचा रस याची पेस्ट करा.
हे मिश्रण केसांच्यया मुळांना नीट लावा आणि ३० मिनिटे ठेवा. यानंतर केस गरम पाण्याने धुवून घ्या
कांदामध्ये भरपूर प्रमाणात 'सल्फर' असते, जे केस गळती थांबवून मुळांना मजबुती देते. मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/hair-care-tips-home-remedies-for-long-hair-coconut-onion-aloe-vera-gel-benefits-kkd99