Manasvi Choudhary
ग्लोईंग स्किनसाठी त्वचेवर महागड्या उत्पादनापेक्षा तुम्ही घरीच सोपे उपाय करू शकता.
स्वयंपाकघरातील काही सोप्या उपायांनी तुमचा चेहरा गोरापान होईल.
बेसन आणि हळद त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.
लिंबू 'नॅचरल ब्लीच' म्हणून काम करते आणि मध त्वचेला हायड्रेटेड ठेवते म्हणून लिंबू आणि मध हे चेहऱ्याला लावा
कोरफडीचा गर आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील जळजळ कमी होते आणि त्वचा सॉफ्ट राहते.
पिकलेल्या पपईचा तुकडा स्मॅश करून चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. पपई चेहऱ्याला लावल्याने मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
तांदळाच्या पिठात कच्चे दूध घालून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातात आणि चेहऱ्यावर लगेच चमक येते.