Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीमध्ये आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. हिवाळ्यात वातावरण थंड असते अशावेळी तुम्ही त्वचेची काळजी घेतली जाते.
थंडीत त्वचा कोरडी पडण्याच्या समस्यांवर घरगुती उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. तुमचेही ओठ हिवाळ्यात कोरडे आणि फाटले असतील तर तुम्ही घरीच काही सोपे उपाय करा.
थंडीत थंड वातावरणामुळे पाणी कमी पितात मात्र भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात संपूर्ण दिवसात दोन ते तीन वेळा ओठांना लिप बाम लावा. आठवड्यातून दोन वेळा कॉफी आणि साखरने ओठांचा स्क्रब करा.
अनेकांना ओठ चाटण्याची सवय असते मात्र असे करणे टाळा ओठ चाटल्याने ते आणखी कोरडे होतात. .
ओठांची त्वचा पातळ असल्याने संवेदनशील असते यामुळे ओठांना कोणतीही लिपस्टिक लावू नका.
खोबरेल तेल लावा रात्री नियमितपणे ओठांची खोबरेल तेल लावून मालिश करा यामुळे ओठ मऊ होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या