Kitchen Tips : कितीही पुसलं तरी किचन चिकट राहतंय? गॅस, ओटा आणि फरशा स्वच्छ ठेवण्यासाठी करा हे 5 बदल!

Saam TV News

फोडणी देताना झाकण ठेवा

स्वयंपाक करताना भाजी, डाळ किंवा इतर पदार्थांना फोडणी देताना अथवा तळण करताना शक्यतो भांड्यावर झाकण ठेवावे.

kitchen tips | pinterest

चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा

स्वयंपाक करताना चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवण्याची सवय लावा. यामुळे धूर आणि हवेत पसरलेले तेलाचे सूक्ष्म कण बाहेर जाण्यास मदत होते.

kitchen tips | pinterest

स्वच्छता करा

स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शेगडी, ओटा आणि आजूबाजूच्या फरशा ओल्या कापडाने पुसून घ्या. ताजे तेल आणि डाग सहज निघतात.

kitchen tips | pinterest

तेलाचा वापर मर्यादित ठेवा

स्वयंपाकघरातही तेलाचे शिंतोडे आणि चिकटपणा अधिक पसरतो. त्यामुळे पदार्थांच्या गरजेनुसारच तेलाचा वापर करावा.

kitchen tips | pinterest

आठवड्यातून एकदा करा सखोल स्वच्छता

आठवड्यातील एक दिवशी गॅस शेगडी, फरशा, चिमणी आणि स्वयंपाकाचा ओटा व्यवस्थित स्वच्छ करा. नियमितपणे स्वच्छता केल्यास तेलकट थर साचणार नाही आणि जुने डागही सहज निघतील.

kitchen tips | pinterest

नैसर्गिक घटकांचा वापर

लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा तेलकटपणा काढण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि पृष्ठभाग चमकदार देखील बनवतात.

kitchen tips | pinterest

स्प्लॅश गार्ड लावा

गॅसच्या मागे स्प्लॅश गार्ड लावल्याने तेल थेट भिंतीवर पडत नाही आणि भिंती स्वच्छ राहतात.

kitchen tips | pinterest

रात्री झोपण्यापूर्वी गॅस आणि ओटा पुसून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी गॅस शेगडी आणि ओटा हलक्या ओल्या किंवा कोरड्या कापडाने पुसून घ्या. यामुळे दिवसभर साचलेली धूळ, तेलाचे डाग आणि अन्नाचे कण निघून जातात.

kitchen tips | pinterest

NEXT : Kitchen Sponge Cleaning Tips: भांडी घासण्याचा स्पंज किती दिवस वापरावा? घरातील स्वच्छतेसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Kitchen Sponge Cleaning Tips | Saam Tv
येथे क्लिक करा