Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्याच्या कडक उष्णतेपासून थोडा दिलासा मिळवण्यासाठी पुण्याजवळील हिल स्टेशनला या विकेंडला नक्कीच फिरायला जा. कमी अंतरावर तुम्ही एक छोटी पिकनिक नक्की करा. पुढील माहितत अंतर आणि ८ सुंदर हिल स्टेशनची नावे दिली आहेत.
हिरवाईने नटलेला डोंगर, धबधबे आणि टायगर पॉइंटसारखी प्रसिद्ध ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात.
शांत वातावरण, दऱ्या आणि सुंदर घाटरस्ते यासाठी खंडाळा ओळखलं जातं. तुम्ही या विकेंडला तिथे नक्कीच जाऊ शकता.
स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण थंड हवामान आणि व्ह्यू पॉइंट्ससाठी लोकप्रिय आहे. पुण्याजवळच असल्यामुळे तिथे अनेक पर्यटक विकेंडला जात असतात.
टेबल लँड, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरण यामुळे विकेंडसाठी उत्तम पर्याय आहे. महाबळेश्वर जवळ असल्याने अनेक पर्यटक तिथे फिरायला जात असतात.
वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान सुट्ट्यांमध्ये सगळेच फिरायला जातात. तिथे फक्त पायी किंवा घोड्यावरून फिरता येतं.
इटालियन स्टाइल शहर, लेक व्ह्यू आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे लवासा आहे.
घनदाट जंगल, वन्यजीव आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरामुळे धार्मिक व निसर्ग पर्यटनासाठी योग्य आहे.
मुळशी धरण आणि हिरव्यागार टेकड्यांमुळे शांत आणि रिलॅक्सिंग विकेंडसाठी उत्तम ठिकाण आहे.
ट्रेकिंग प्रेमींसाठी स्वर्ग असेलेले ठिकाण हे राजमाची आहे. तिथे किल्ला, दऱ्या आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव देणारं ठिकाण तुम्ही पाहू शकता.