Saam Tv
पावसाळ्यात महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य खूलून निघते. पश्चिम घाटाचे सौंदर्य, हिरवेगार डोंगर, थंडगार वातावरणामुळे सप्टेंबरमध्ये फिरण्याचा अनुभव खास असतो. सीट पॉईंट, वेण्णा लेक, एलिफंट हेड, स्ट्रॉबेरी फार्म्स ही इथली प्रमुख स्थळ आहेत.
तलावांचे किंवा सरोवरांचे शहर म्हणून राजस्थानातील उदयपूर ओळखले जाते. पावसाळ्यात येथील हवामान आल्हाददायक असते. थंड वारा आणि वातावरणातील शांतता मनाला भिडते. पॅलेस लेक, पिछोला लेक, सिटी पॅलेस ही इथली मुख्य आकर्षण आहेत.
निळेशार पाणी, सुंदर पर्वतरांगा यासाठी लेह लडाख ओळखले जाते. मोकळे निळे आकाश आणि गर्द हिरवाई अनुभवायची असेल तर सप्टेंबर महिन्यात लेह लडाखला आवर्जुन भेट द्यावी.
केरळमधील मुन्नार चहाच्या मळ्यांसाठी आणि धुक्यांनी वेढलेल्या डोंगररांगासाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबरमध्ये पावसानंतर हिरवागार निसर्ग आणि थंड वातावरणामुळे मनाला शांती मिळते.
कर्नाटकातील कूर्गला 'कॉफी कंट्री' म्हणूनही ओळखलं जातं. सप्टेंबरमध्ये हिरव्यागार दऱ्या, कॉफीच्या मळ्यांचा परिसर आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहे.
व्हॅली ऑफ फ्लॉवरर्सला भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वोत्तम असतो. सप्टेंबरच्या सुरूवातीच्या काही आठवड्यांमध्ये अनेक फुले बहरलेली असतात.
उत्तराखंडमधील नैनिताल हे तलाव आणि डोंगरांच्या सुंदर संगमासाठी नैनिताल ओळखलं जात.सप्टेंबरमधले थंड वातावरण, डोंगरांचे सौंदर्य मन मोहून टाकतं.
सप्टेंबरमध्ये काही भागांत पावसाचा जोर कायम असतो. तर काही ठिकाणी थंडीचा पारा वाढलेला असतो . हिम्सखलन ,भूस्खलन यांसारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेत प्रवास करावा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.