ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकवेळा अॅसिडिटीची समस्या उद्भवते.
तुम्हाला पण सतत अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास या पदार्थांचे सेवन नक्की करा.
अॅसिडिटीची समस्या उद्भवल्यास तुम्ही ताक पिऊ शकता. यामधील लॅक्टिक अॅसिड अपचनाचा त्रास दूर करतो.
अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तुम्ही पुदिण्याचे पानं खाऊ शकता यामधील नैसर्गिक कुलिंग एजंट छातीमधील जळजळ कमी करण्यास मदत करते.
आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
लवंग मधासोबत खाल्ल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो.
अॅसिडिटीचा त्रास झाल्यास तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.