ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील महाराष्ट्र राज्य हे डोंगराळ प्रदेशांनी भरलेले आहे. येथे चौहू बाजूंनी हिरवळ आणि थंड हवेचे वातावरण आहे.
मुंबई आणि पुण्याच्यामध्ये वसलेले लोणावळा हे शहर हिल स्टेशन म्हणून सुप्रसिध्द आहे. येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. लोणावळ्याला प्रसिध्द चिक्की आणि भव्य दऱ्यांसाठी ओळखले जाते.
आशियातील सर्वात लहान हिल स्टेशन जिथे प्रदुषणमुक्त वातावरणात घोडेस्वारीचा आणि थंड हवेचा आनंद घेता येतो.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे. घनदाट जंगल, थंड हवामान आणि निसर्गरम्य पॉइंट्ससाठी प्रसिद्ध आहे. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादनासाठीही महाबळेश्वर ओळखले जाते.
महाबळेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले शांत आणि सुंदर हिल स्टेशन. पाच पठारांवर वसलेले असल्यामुळे “पाचगणी” हे नाव देण्यात आले आहे. टेबल लँड हे पाचगणी मधील आकर्षण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले थंड, शांत आणि हिरवेगार हिल स्टेशन म्हणून ओळखण्यात येते. आंबोली घाट, आंबोली धबधबा, हिरवेगार जंगल हे येथील प्रमुख आकर्षण आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गरम्य असे ठिकाण. तांबडी माती व डोंगर रांगांसाठी प्रसिद्ध असून रंधा फॉल्स, विल्सन डॅम, आर्थर लेक ही येथील महत्त्वाची स्थळे आहेत.
आदिवासी संस्कृती आणि पैलूंचे शहर म्हणून जव्हार हिल स्टेशनला ओळखण्यात येते. जय विलास पॅलेस, दाभोसा धबधबा ही येथील प्रसिद्ध स्थळे आहेत.