ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फेब्रुवारी महिना आता सुरु होत आहे. तुम्ही फेब्रुवारी महिन्यात सुंदर फॅमिली ट्रिप प्लॅन करु शकता. जाणून घ्या ठिकाणे
ऋषिकेशला जाण्याचा फॅमिली प्लॅन तुम्ही करु शकता. ऋषिकेशमध्ये फिरण्यास अनेक चांगल्या जागा आहेत. तसेच तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंग घेऊ शकता.
केरळमधील सर्वात सुंदर जागा म्हणून मुन्नरला ओळखण्यात येते. मुन्नर हे फॅमिली सोबत फिरण्यासाठीचे बेस्ट ठिकाण आहे.
सिक्किम हे हिमालयाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. पेलिंग आणि युमथांग व्हॅली येथील प्रमुख आकर्षणे मानली जातात.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. ज्यांना निसर्गरम्य ठिकाणे आवडतात त्यांनी येथे नक्की भेट द्यावी.
तुम्ही फॅमिलीसोबत आग्रा येथे देखील भेट देऊ शकता. आग्रा हे दिल्लीपासून थोड्याच अंतरावर आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, आग्रामध्ये पाहण्यासारखी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.
जर तुम्हाला राजस्थानला भेट द्यायची असेल तर उदयपूरला जा. उदयपूरची ऐतिहासिक स्थळे आणि तलाव तुम्हाला एक वेगळाच आनंद देतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.