Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांची उंची वाढावी.
पालक मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना पौष्टीक आहार आणि पुरेशी झोप देतात.
तज्ज्ञांच्या मते मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांनी व्यायाम करणे गरजेचे आहे.
व्यायामात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुलांना मैदानी खेळ शिकवले पाहिजे.
मुलांनी व्यायामासाठी लटकण्याचे विविध मैदानी खेळ खेळले पाहिजे.
मुलांनी लटकण्यांसंबंधीत व्यायाम शिकवल्याने मजबूत पाठीचा कणा ताणला जातो.
मोठ्या व्यक्तींसोबत लहान मुलांसाठी सुद्धा ताडासनाने फायदा होतो.
स्किपिंग लहान मुलांना आवर्जून खेळायला द्या. त्याने उंची बरोबर हाडे मजबूत होतात.
कोब्रा स्ट्रेचिंगमुळे पाठ आणि मणक्याची लवचिकता सुधारते. त्याने उंची वाढण्यास मदत होते.