ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उंची मुख्यत: जिनेटिक्सवर अवलंबून असते. पण जर योग्य व्यायाम केल्यास, स्ट्रेचिंग केल्यास उंची वाढण्यास मदत होते.
हॅंगिंग म्हणजे बारवर लटकणे ही एक चांगला व्यायाम आहे. दोन्ही हातांनी बार पकडून 20 ते 30 सेकंद लटका. हा व्यायाम केल्यास तुमच्या पाठीचा कणा आणि स्नायूंना मजबूत बनवण्यास मदत करते.
स्ट्रेचिंगचा व्यायाम हा उंची वाढविण्याकरिता सर्वात चांगल्या व्यायामामधील एक आहे. स्ट्रेचिंग केल्याने शरिर रिलॅक्स होण्यास मदत होते.
स्ट्रेचिंग पुश-अप हा व्यायाम सुध्दा शारिरीक शक्ती वाढवण्यास आणि उंची वाढवण्यास मदत करतो.
दोरी उड्या मारणे हि एक कार्डियो एक्सरसाईज आहे जी पूर्ण शरिराला फिट ठेवते. दोरी उड्या मारल्याने उंची वाढण्यास मदत होते.
सूर्य नमस्कार हे एक अत्यंत लाभदायक योग अभ्यास आहे. जो शरिरीला लवचिक बनवतो आणि हाडांची लांबी वाढण्यास मदत होते.
दिवसाला 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन D भरपूर घ्या आणि तसेच साखर , जंक फूड खाणे कमी करा.
उभे राहून हळूच पुढे वाका आणि पायाचे अंगठ्याला स्पर्श करा. हा व्यायाम केल्याने Lower Back स्ट्रेच होते.