ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विकेंडला सुट्टिचा आनंद घेण्याकरिता जास्त लांब न जाता मुंबई जवळील बीचेसचा आनंद घ्या.
जुहू बीच हा मुंबईतील ओळखला जाणारा सर्वात प्रसिध्द बीच आहे. येथे विकेंडचा तुम्ही पुरेपुर आनंद घेऊ शकता. जुहू बीचवरील स्ट्रिट फुड हे आस्वाद घेण्यासारखे आहे.
हा बीच बोरिवलीला असून येथे जाण्यासाठी तुम्ही फेरीचा वापर करु शकता. फेरीने २० ते २५ मिनिटांत तुम्ही गोराई बीचवर पोहचाल. शांत आणि सुंदर तसेच कमी गर्दी असणारा हा बीच आहे.
वर्सोवा बीच हा फिशिंग व्हिलेजसाठी ओळखला जातो. हा आरामदायी वातावरणात असलेले बीच आहे.
मुंबईपासून फक्त १ तासाच्या अंतरावर असलेला विरारमधील हा बीच अत्यंत लोकप्रिय आहे. मोठा समुद्रकिनारा असलेला हा बीच रिसॉर्टसाठी प्रसिध्द मानला जातो.
मुंबईपासून जवळ असलेला केळवा बीच पालघरमध्ये स्थित आहे. हे ठिकाण फॅमिली पिकनीक करिता प्रसिध्द आहे. बीचपासून थोड्याच अंतरावर केळवा किल्लाही आहे.
डहाणू बीच हा पालघर जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. तसेच जवळच डहाणू किल्ला श्री महालक्ष्मी मंदिर यांसारखी इतर ठिकाणे देखील आहेत.