ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोकर्ण हे कर्नाटकातील एक छोटे शहर आहे. गोकर्ण शहर हे शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिध्द आहे.
ओम आकाराचा हा बीच ध्यान आणि योगासाठी एक आदर्श ठिकाण आहे.
येथील सोनेरी वाळू आणि सर्फिंगसाठी योग्य असलेल्या लाटा तुम्हाला मंत्रमुग्ध करुन टाकतील.
या बीचला फुल मून म्हणूनही ओळखले जाते. हा समुद्रकिनारा निळ्या पांढऱ्या वाळूने वेढलेला आहे. येथील वातावरण शांत आणि निसर्गरम्य आहे.
गोकर्ण शहराजवळील असलेला हा मुख्य किनारा आहे. येथे तुम्ही स्विमिंग आणि सर्फिंगचा आनंद घेवू शकता. हिवाळ्यात गोकर्ण मधील सगळ्या बीचेसला तुम्ही भेट देवू शकता.
प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांवर पोहचण्यासाठी ट्रेकिंग करावी लागते. गोकर्णातील समुद्रकिनाऱ्यांना जोडणारी ही ट्रेकिंग एक रोमांचक अनुभव देते.
जेट स्कीइंग, बनाना बोट राईड आणि पॅरासेलिंग सारखे अॅडव्हेंचरता तुम्ही आनंद घेवू शकता.
या लहान आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही काही एकांत क्षण घालवू शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता.