Manasvi Choudhary
२०२६ नवीन वर्षाची सुरूवात फिट आणि उत्साही करायची असल्यास तुम्ही आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश केला पाहिजे.
फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानल जातात. नवीन वर्षात जास्तीत जास्त फळे खाण्याचा संकल्प करा.
नवीन वर्षानंतर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही पपई हे फळ खा. पपई खाल्ल्याने शरीराचे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
नवीन वर्षात आजारपणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त किवी खा ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सफरचंद हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. सफरचंद खाल्ल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंब हे एक 'सुपरफूड' आहे. हे शरीरातील थकवा दूर करून उत्साह वाढवते.
पेरू खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते आणि हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.