पावसाळ्यात घरात काय बसता? महाराष्ट्रातील 'हे' सुंदर घाट बघतायत तुमची वाट; आजच प्लॅन करा पावसाळी ट्रिप!

Manasvi Choudhary

हिरवागार निसर्ग

पावसाळा सुरू झाला की, सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक भेट देतात.

Monsoon Travel Tourism | google

प्रसिद्ध घाट

डोंगरावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, रस्त्यावर उतरलेलं दाट धुकं हा नजारा पाहण्यासाठी तु्म्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट येथे भेट द्या.

Ghat | Google

घाटातील सुंदर सौंदर्य

नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि पावसाचा खरा आनंद घेण्यासाठी घाटांपेक्षा उत्तम जागा दुसरी कोणतीच असू शकत नाही.

Beautiful Ghat In Monsoon | Saam Tv

माळशेज घाट

ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला माळशेज घाट हा पावसाळ्यात पर्यटकांसाठी आकर्षणाचे केद्रबिंदू असतो. नागमोडी रस्ते आणि डोंगरावरून थेट रस्त्यावर कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

Malshej Ghat | google

खंडाळा घाट

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर असलेला खंडाळा घाट हा बोरघाट या नावाने देखील ओळखला जातो. लॉंग ड्राईव्हसाठी येथे पर्यटक खास एन्जॉय करण्यासाठी येतात.

Khandala | yandex

वरंधा घाट

पुण्याला महाडशी जोडणारा वरंधा घाट हा त्याच्या अथांग दऱ्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात येथील धबधब्यांचे रूप मनाला मोहून टाकतात.

Varandha Ghat

दिवे घाट

पावसाळ्यात दिवे घाटाचं सौंदर्य मनाला मोहून टाकते. संपूर्ण घाट पिवळसर-हिरव्या गवताने नटतो. आषाढी एकादशीच्या काळात याच घाटातून माऊलींच्या पालखीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते

Dive Ghat

बोपदेव घाट

पुण्यातून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या बोपदेव या घाटातून संध्याकाळच्या वेळी संपूर्ण पुण्याचे विहंगम दृश्य आणि पावसाळी ढगांची गडद सावली मनाला शांतता देऊन जाते.

Bopdev Ghat

NEXT: पायात ही लक्षणं दिसतील तर व्हा सावध, असू शकते या आजाराचे लक्षण

येथे क्लिक करा...