Kurkurit Mirchi Recipe: वडापावच्या गाडीवर मिळणारी बेसनातली कुरकुरीत मिरची घरी कशी बनवाल?

Siddhi Hande

वडापाव

मुंबईचा फेमस वडापाव हा सर्वांनाच आवडतो. मुंबईत ठिकठिकाणी वडापावचे स्टॉल असतात.

Vadapav Recipe | Yandex

भजी

वडापावच्या स्टॉलवर तुम्हाला बटाटा भजी, कांदा भजी आणि मिरची भजीदेखील मिळतात.

Kurkurit Mirchi Recipe | Google

कुरकुरीत मिरची

बेसनातली कुरकुरीत मिरची तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. ही रेसिपी खूपच सोपी आहे.

Kurkurit Mirchi Recipe | Google

मिरच्या कापून घ्या

मिरची भजी बनवण्यासाठी पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या. या मिरच्या मधून कापून घ्या. त्याचे दोन तुकडे करु नका.

Kurkurit Mirchi Recipe | Google

मीठ लावा

यानंतर मिरच्यांमध्ये थोडं मीठ टाकून ठेवा. या मिरच्या ५ मिनिटं तशाच ठेवा.

Kurkurit Mirchi Recipe | Google

तिखटपणा

यानंतर मिरच्यांमधील मीठ बाहेर काढून टाका परंतु मिरची धुवू नका. जेणेकरुन त्यातील तिखटपणा निघून जाईल.

Kurkurit Mirchi Recipe | Google

लाल तिखट

यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यात थोडं लाल तिखट आणि मीठ टाका. यात थोडी कोथिंबीरदेखील टाकू शकतात.

Kurkurit Mirchi Recipe | Google

पीठात पाणी टाका

या बेसन पीठात पाणी टाकून छान मिक्स करा. पिठाच्या गुठल्या होऊ देऊ नका.

Kurkurit Mirchi Recipe | Google

पीठ लावून घ्या

यानंतर मिरच्या या पीठात घोळवून घ्या. सगळीकडून मिरच्यांना बेसन पीठ लागायला हवे.

Kurkurit Mirchi Recipe | Google

तेल गरम करा

एका बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये एकेक मिरची सोडा.

Kurkurit Mirchi Recipe | Google

तळून घ्या

मिरची छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. ही मिरची खूप कुरकुरीत लागते.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

Next: फ्रिजमधील लिंबूही लगेच सुकतात? 'ही' ट्रिक फॉलो करा, Lemon राहतील ताजे

Lemons | yandex
येथे क्लिक करा