ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेसन – १ कप, साखर – ¾ कप, तूप – ½ कप, पाणी – ¼ कप, वेलदोडा पूड आणि सुकामेवा – या साहित्यासह रेसिपी सुरू होते.
एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात बेसन घालून मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजा. हा टप्पा बर्फीच्या चवसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
एका वेगळ्या भांड्यात साखर आणि पाणी गरम करून एक तारी पाक तयार करा. तो चिकटसर आणि थोडा पातळ असावा.
भाजलेले बेसन थोडं थंड झाल्यावर त्यात तयार साखर पाक हळूहळू घालून नीट मिसळा. मिश्रण गाठीविरहित आणि गुळगुळीत असायला हवे.
चव वाढवण्यासाठी थोडी वेलदोडा पूड, बदाम/काजू चे तुकडे घाला. यामुळे सुगंध आणि टेक्स्चर दोन्ही चांगले मिळते.
एका तुप लावलेल्या थाळीत हे मिश्रण ओता आणि समान रीतीने पसरवा. वरून सुकामेवा पसरा.
मिश्रण थोडं थंड झाल्यावर हवे तसे आकार कापून वड्या तयार करा. पूर्ण थंड झाल्यावर सर्व्ह करा आणि हवाबंद डब्यात साठवा.