ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रायड राईससाठी एक दिवस आधीचे किंवा पूर्णपणे थंड झालेले तांदूळ वापरणे उत्तम. यामुळे तांदूळ सुटे राहतात आणि चिकटत नाहीत.
गाजर, मटार, शिमला मिरची, कांदा, कोबी इत्यादी भाज्या बारीक चिरून तयार ठेवा. यामुळे फटाफट फ्राय करता येते.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण व कांदा परतून घ्या. यामुळे बेस फ्लेवर तयार होतो.
उच्च आचेवर भाज्या परताव्यात. त्या अर्धवट शिजल्या तरी चालतील, पण कुरकुरीतपणा राहायला हवा.
भाज्यांमध्ये थंड झालेले तांदूळ घालून एकत्र करा आणि सगळं मिश्रण नीट हलवा.
थोडेसे सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि मिरपूड घालून तांदळाला चवदार बनवा. सॉस प्रमाण जास्त करू नका.
वरून बारीक चिरलेला हिरवा कांदा (spring onion) घालून गरम गरम सर्व्ह करा.