ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह हा अनुवांशिक आजार असला तरी सध्या तो चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे त्याची लागण होत असतो किंवा उद्धवत असतो.
लाईफस्टाईलमध्ये सुधारणा आणि चांगल्या आहाराच्या मदतीने मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण आणू शकतो. यासाठी फळभाज्या फायदेशीर आहेत.
मधुमेह झाल्यानंतर खाण्याच्या अनेक गोष्टींवर निर्बंध लागत असतात. त्या वर्ज्य केल्या जात असतात. पण फळभाज्यांमधील दोडके हे हे खूप फायदेशीर ठरतात.
मधुमेहाची समस्या उद्भवली असेल तर भोपळ्याऐवजी तुम्ही दोडक्याची भाजी खावी. या भाजीमुळे डायबिटीस कंट्रोल होत.
दोडक्यामध्ये डायटरी फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम अशी जीवनसत्त्व असतात जे शरीराला पोषक असततात.
दोडक्याची भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होत असते.
दोडक्याच्या नियमित सेवनाने काविळ होण्याचा धोकाही कमी होत असतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.