Shruti Vilas Kadam
दोरी उड्या हा चांगला कार्डिओ व्यायाम असून नियमित केल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
दोरी उड्यांसोबत योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
दोरी उड्यांमुळे हृदयाची गती वाढते आणि कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारण्यास मदत होते.
नियमित स्किपिंगमुळे पाय, मांड्या आणि ग्लूट्सच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.
रोज थोड्या प्रमाणात दोरी उड्या मारल्याने शरीराची सहनशक्ती आणि endurance हळूहळू वाढू शकते.
स्किपिंगमध्ये हात-पायांचा समन्वय आवश्यक असल्याने coordination, balance आणि agility सुधारण्यास मदत होते.
सकाळी किंवा संध्याकाळी दोरी उड्या मारू शकता. जेवणानंतर लगेच करू नका; जेवणानंतर साधारण 2–3 तासांचे अंतर ठेवणे चांगले. सुरुवातीला 100 उड्या हळूहळू करा आणि त्रास जाणवल्यास थांबा.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.