ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्याकडे जेवणात अनेकदा शेंगदाणे वापरले जातात. पोहे, उपमा ते अगदी भाजीमध्येही शेंगदाण्याचा समावेश असतो.
शेंगदाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटामिन ई आणि फॅट्स आढळतात.
नियमितपणे शेंगदाणे खाणे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते.
सकाळी सकाळी भिजवलेले शेंगदाणे खालल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
शेंगदाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. भिजवलेले शेंगदाणे स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.