ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संस्कृतीत पुजेला फार महत्व दिले जाते. खास संध्याकाळ हा देवाच्या भक्तीचा काळ मानला जातो. त्यामुळे एक दिवा तरी काहीजण घराच्या दाराजवळ लावतात.
चला तर मग पाहूयात संध्याकाळीच दाराजवळ दिवा लावण्याचे फायदे
घराच्या दरवाज्यावर तुपाचा दिवा लावल्याने काही प्रमाणात वास्तु दोषापासून मुक्ती मिळते.
घरातील मुख्य दरवाजाच्या जवळ दिवा लावण्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.
संध्याकाळच्या वेळी दरवाज्याजवळ दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
धन प्राप्तीसाठी बहुतेकदा संध्याकाळच्या वेळी दरवाज्याजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरते.
घरातील मुख्य दरवाजाच्या उजव्या दिशेस दिवा ठेवणे शुभ मानले जाते.