ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिंबाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे आरोग्य आणि त्वचा निरोगी राहाते.
दररोज तुमच्या आहारात लिंबाचा समावेस केल्यास आरोग्याला अनेक फायदे दिसून येतील.
तुमच्या आहारात दररोज लिंबाचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
आहारात लिंबाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहाते.
दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
लिंबूपाणी प्यायल्याने शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते ज्यामुळे हृदय निरोगी राहाण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.