Ruchika Jadhav
अनेक व्यक्तींना घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळणे आवडते.
बऱ्याच व्यक्ती मांजरींवर प्रेम करतात. त्यामुळे घरामध्ये मांजरी पाळतात.
घरात मांजर पाळण्याचे आपल्याला विविध फायदे होतात.
मांजर पाळल्याने त्या घरात कधीच उंदिर होत नाहीत. उंदिर झाल्यास मांजर लगेचच त्यांचा फडशा पाडते.
असं म्हणतात मांजरीची नाळ सापडल्याने आपल्या आयुष्यात समृद्धी आणि पैसे येतात.
मांजर किंवा बोका या दोघांमध्ये नकारात्मक उर्जेला रोखण्याची ताकद असते, असं शास्त्रात म्हटलं आहे.
आपला मूड खराब असेल त्यावेळी मांजरीमुळे आपला मूड नॉर्मल होण्यास मदत होते.
मांजर घरात असल्यास त्या घरामधील व्यक्ती सतत आजारी पडत नाहीत, असंही काही मांजर प्रेमी सांगतात.
टीप: ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्ही वास्तुशास्त्राची ज्योतिशांकडून माहिती घेऊन मांजर पाळण्याचा निर्णय घेऊ शकता.